Our Inspirattion

Dr.J.J. Magdum polytechnic was started in the year 1984 and it is a self-financed institute. It is affiliated to MSBTE approved by All India Council of Technical Education (AICTE), New Delhi. The Institute is reputed for its high academic standards,excellent infra-structural facilities, Experienced faculty and well maintained discipline.

 

महाविद्यालयीन शिक्षण दोन प्रकारात मोडतं.
1. व्यक्तिमत्व विकासाचे शिक्षण – जसे कला, संस्कृती व मानवी व्यवहाराचे शिक्षण.
2. तंत्रशिक्षण – जे माणसाला प्रत्यक्ष कृतीची कौशल्ये शिकवते व उद्योग-व्यवसायांच्या संधी निर्माण करून देते.
पदोपदी आपली इच्छा असो-नसो, जीवनाच्या प्रत्येकअंगास तंत्रज्ञानाचा स्पर्श झालेलाच आहे. यांत्रिकीकरण वाढले आहे. यंत्रांची ही संरचना राबती ठेवण्यासाठी व सतत बदलनाऱया आव्हानास पुरून ऊरण्यासाठी त्यांचा विकास करावा लागतो.बदलत्या काळानुसार निर्माण होणाऱया गरजांची पूर्ती करण्यासाठी नव्या डिझाईन व विकासाचे मुल्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे.साक्षर की निरक्षर या धर्तीवर यापूढे तंत्रशिक्षीत की अशिक्षीत असा प्रश्न निर्माण होऊ घातला आहे. तंत्रशिक्षण हे आधुनीक माणसाच्या गरजा भागवण्यासाठी, आवश्यक ऊद्योग व्यवसायाच्या संधी आपल्याशा करून देणारे मुलभूत शिक्षण तर बनले आहेच, शिवाय जगभरात प्रचंड प्रमाणात मागणी असलेल्या भारतीय युवकांची मुलभूत अर्हता ही ठरले आहे.पश्चीमेत पहिली औद्यागिक क्रांती झाली त्यावेळी आपल्याला त्याचा गंधही नव्हता. आज जगभरातल्या मोठमोठ्या औद्यागिक कंपन्या भारतीय ऊद्योजकांच्या मालकीच्या होत आहेत. त्यामुळे व तशीही तंत्रशिक्षण कुशल भारतीयांची गरज केव्हा नव्हे एवढी इथून पुढे निर्माण होणार आहे. त्याची फळे चाखायची तर सुरूवात आत्तापासूनच करावयास हवी. बदलत्या काळाचा कल ओळखून दिशा ठरवली नाही तर भोवती समृद्धता आहे पण ते ऊपभोगण्याचे साधन नाही अश्या जून्याच परिस्थितीचे आपण वाहक होऊ. हे टाळायचे असेल तर तंत्रशिक्षणाला पर्याय नाही. अभियीत्रिकी तंत्रशिक्षण म्हणजे विज्ञानाचा ऊपयोग करून साधनसंपत्ती निर्माण करण्याचे कौशल्य शिकवणारे शिक्षण. हे आत्मसात करणे काळाची गरज बनले आहे.इयत्ता दहावीच्या गुणांवर तंत्रनिकेतनातील विविध शाखांच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेता येऊ शकतो. या प्रकारच्या कौशल्यावर आधारीत नोकरी व व्यवसायावर आधारित काम करत राहिल्यास ऊपलब्ध व प्रचलित तंत्रज्ञानात शिरकाव करून घेता येतोच पण त्याचवेळी भविष्यातील येऊ घातलेल्या व विकसीत होत असलेल्या तंत्रज्ञानाचा अंदाज व दिशा लक्षात येते. त्या दिशेने योग्य पावले ऊचलल्यास भावी काळ हा अधिक सौख्यदायक ठरतो.
उदार आर्थिक धोरण व खुलेपणा यामुळे व्यापाराच्या संधी वाढल्या. लोकसंख्या व वाढणाऱया बाजारपेठेमुळे ऊत्पादन, व्यापार व सेवा ऊद्योगात कुशल मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेउन तंत्रशिक्षणसंस्थाचे पेव फुटले. अचानकपणे नव्याने भरपूर संस्था सुरू झाल्यामुळे प्रशिक्षित व अनुभवी प्राध्यापकांची उणीव भासते. ही उणीव भरून काढण्यासाठी चकचकीत ईमारती, आकर्षक जाहिराती,मोठाले डीजीटल फलक व अर्थहिन शब्दांच्या भुलभूलैयात विद्यार्थी व पालकांना संस्था गुंगवून टाकतात. सर्वसामान्य  विद्यार्थी व पालकांना आपली फसवणूक झाल्याचे खुप ऊशिरा लक्षात येते. हे टाळायचे असेल तर मुलभूत गोष्टींकडे गांभीर्याने पहायला हवे.
प्रवेश घेतेवेळी संस्थेची स्थापना किमान दहा वर्षापूर्वीची असावी. त्या संस्थेत शिक्षण घेउन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्याचा सल्ला घ्यावा. जाहिरातींचा मारा करून नसलेली गुणवत्ता असल्याचा भास निर्माण केला जातो आहे.. औषध लावून पिकवलेल्या फळासारख्या, अशा झगमगीतपणाविषयी साशंक राहणे पालक व विद्यार्थी यांच्या हिताचे ठरते. न्यायालयाने व शासनाने मान्यताप्राप्त व नियमित प्राचार्यांची नेमणूक करणे संस्थेस बंधनकारक केले आहे. शिक्षणसंस्थेचा प्रमुख या नात्याने घटनात्मकरित्या प्राचार्यांची जबाबदारी मोठी असते. विकासाची दिशा ठरवणारा, शिस्तशीर कार्यप्रणाली राबवणारा, विद्यार्थीहित जपणारा व शिक्षण या मानवी विकासाच्या मुलभूत कल्पनेशी ठाम राहणारा अशी प्राचार्यांची भुमिका तो जर मान्यताप्राप्त व नियमित असेल तरच पार पाडता येते. कुटूंबप्रमुखाचेच पाय स्थिर नसतील तर कुटूंबाचा डोलारा डळमळायला लागतो, हे लक्षात घ्यावयास हवे. पाल्याच्या शिक्षणासाठीची गुंतवणूक ही त्याचे भविष्य घडवणारी असल्याने प्रवेशावेळी वरील गोष्टींचा सखोल विचार होणे आवश्यक वाटते. आर्थिक खर्च, व्यतित होणारा कालावधी,पदरात पडणारे दान व मिळणारा अनुभव यांचा योग्य विचार करून सल्लामसलतीने व पूर्ण चौकशी करून विद्यार्थ्यांच्या पुढील भावी शिक्षणाचा निर्णय घेतल्यास ते जास्त संयुक्तिक होईल याची आम्हाला खात्री आहे. एक मंथन या दृष्टीने हा विचार आपणासमोर ठेवला आहे. सल्लामसलत, विचार-विनिमय व माहितीसाठी आम्ही सर्व कार्यालयीन वेळेत हजर आहोतच, पण इतर वेळीही आम्ही उपलब्ध असू.
संपर्क - डॉ. जे. जे. मगदूम पॉलिटेक्निक, शिरोळ-वाडी रोड,जयसिंगपूर.416101. ता.शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. फोन –   02322-229572, 225572,www.jjmpoly.co.in   डॉ. जे. जे. मगदूम पॉलिटेक्निक ही संस्था 1984 साली स्थापन झाली. आखील भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) नवी दिल्ली व तंत्रशिक्षण संचालनालय (DTE) मुंबई, मान्यताप्राप्त आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) मुंबईशी संलग्न आहे. तीन वर्षाचे पूर्णवेळ अभियांत्रिकी व तंत्रशिक्षणाचे अभ्यासक्रम संस्था चालवते.

गेल्या 28 वर्षापासूनचे यशस्वी व गुणवंत माजी विद्यार्थी परिवार हे आमचे मुल्य .   —
ऊदाहरणे… COMPUTER ENGINEERING  1.अमोल चौगुले, नेटवर्क इंजिनियर, IBM, मलेशिया. 2.मारूती गायकवाड, सॉफ्टवेअर इंजिनियर, TCS, नेदरलँड.3. संजय देसाई, सपोर्ट इंजिनियर,मायक्रोसॉफ्ट,बेंगलोर.4.अमोल चव्हाण, सॉफ्टवेअर इंजिनियर,NVDIA,पूणे.
INDUSTRIAL ELECTRONICS & ELECTRONICS TELECOMMUNICATION ENGG 1.अमित कामत, सिनियर डेव्हलपर, TCS. 2.सतिश भिसुरे, असिस्टंट मॅनेजर, JSW.  3.सचीन भोसले, असिसटंट मॅनेजर, TCS,  इंग्लंड. 4.गणपत पाटील, टेक्निकल लिडर, टेक महिंन्द्रा, मलेशिया.5. देविदास खुर्द, टाटा कम्युनिकेशन, पूणे. 6. किरण चौगुले, शिपींग कार्पोरेशन, गोवा.
CIVIL ENGINEERING 1. दिलीप खरे, सिव्हील इंजिनियर, ठाणे म्युनिसीपल कार्पोरेशन. 2. चौगुले, लंडन स्ट्रक्चरल कंपनी, इग्लंड. 3. सुनिलकुमार भारद्वाज, स्ट्रक्चरल इंजिनियर, DRDO. 4. प्रेमकुमार राठोड, BMC.
MECHANICAL ENGINEERING1.तस्लिम अरिफ, क्वालिटी ऍश्युरन्स मॅनेजर, नॅशनल केबल्स, दुबई. 2. चेतन पवले, ऑपरेशन हेड, हनीवेल ऑटोमेशन इंडीया लिमटेड, मुंबई. 3. प्रदिप शिंगारे, RTO ऑफिसर, मुंबई. 4.निलेश कुलकर्णी, मॅनेजिंग डायरेक्टर, टेक्नोव्हिजन. 5. तुषार कुलकर्णी, मॅनेजिंग डायरेक्टर, मेकॅसॉफ्ट 6. तौफिक हुदली, मॅनेजिंग डायरेक्टर, हुदली अँड सन्स.

तंत्रशिक्षणातील अद्यावत ज्ञानाने परिपूर्ण, प्रशिक्षीत व अनुभवी शिक्षकवृंद हा आमचा ठेवा.—
वानगीदाखल काही ऊदाहरणे…. 1.  महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE)मुंबई ने तंत्रशिक्षणातील त्यांचा अनुभव व कर्तुत्व लक्षात घेऊन  प्राचार्य श्री. ए.जी. पुराणिक यांची निवड आपल्या ऍकॅडेमिक कौन्सील वर केली आहे.  2.संस्थांच्या शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेऊन त्याचा रिपोर्ट सादर करणाऱया मॉनिटरिंग कमिटीवर या संस्थेतील जास्तितजास्त शिक्षक चेअरमन व सदस्य म्हणून काम पाहतात. 3. शैक्षणिक अवेक्षण समितीस सामोरे जाण्यापूर्वी अनेक संस्था ट्रायल मॉनिटरिंग करून घेण्यासाठी आमच्या तज्ञ शिक्षकांना बोलाऊन सल्लामसलत करतात. 4.करिक्युलम रिव्हीजन प्रोजेक्टमध्ये सक्रिय सहभागी होत विविध विषयांचा सिलॅबस डिझाईन करतात. 5.नव्या तंत्रज्ञानाशी एकरूप होणारी G स्किमची अंलबजावणी कशी करावी याचे मार्गदर्शन करतात. 6. लॅब मॅन्युअल डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये डिझाईन केलेली मॅन्युअलस् महाराष्ट्र व इतर राज्यातही वापरली जातात. 7. पूर्ण महाराष्ट्रातील पॉलिटेक्निकसाठी MSBTE तर्फे ऍकॅडेमिक कॅलेंडर तयार करतात.याशिवाय सिव्हील इंजिनियरिंग डिपार्टमेंट मध्ये “मटेरियल टेस्टींगचे” काम अव्याहत सुरू आहे. खरे बिल्डर्स, पारेख कनस्ट्रक्शन्स, जाधव कनस्ट्रक्शन्स या कनस्ट्रक्शन्स कंपन्या आपल्या कामाचा दर्जा टिकावा म्हणून, इथूनच मटेरियल टेस्टींग करून नेतात.